एअरपोर्ट ऑथॉरिटीनं केला अन्याय : सेना आणि मनसेचं आंदोलन सुरू

May 4, 2009 8:57 AM0 commentsViews: 1

4 मे एअरपोर्ट ऑथॅरिटीनं 2000 कामगारांच्या महाराष्ट्राबाहेर केलेल्या बदलीला स्थगिती मिळण्यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने पुढाकार घेतला आहे. 15 जूनपर्यंत एअरपोर्ट ऑथॉरिटीने कामगारांच्या बदल्यांना स्थगिती द्यावी. तसंच केंद्रात नवीन सरकार स्थापनेनंतर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेचे नेते आंनद आडसुळ यांनी एअरपोर्ट ऑथोरीटी कडे केलीय. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सूरूच राहणार असल्याचंही शिवसेनेनं सांगीतलं आहे. यामुळ मनसे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर मनसेनेही आंदोलनांचा इशारा दिला आहे.

close