सहारनपूर दंगलीसाठी यूपी प्रशासनच जबाबदार – गुप्तचर विभागाचा अहवाल

July 27, 2014 3:44 PM0 commentsViews: 1126

sahanpur

27  जुलै : उत्तर प्रदेशातल्या सहारणपूरमधला संघर्ष चिघळायला राज्य प्रशासनच जबाबदार आहे, असा अहवाल उत्तर प्रदेशच्या गुप्तचर विभागाने दिला आहे. सध्या इथली परिस्थितीत तणावपूर्ण पण शांत आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी दंगलीप्रकरणी 20 जणांना अटक केली असून संशयितांची चौकशीही सुरु आहे.

दोन समाजांत एका जमिनीवरून सुरू असलेला वाद शनिवारी सकाळी अधिकच उफाळून आला. दोन्ही समाजांतील गट एकमेकांना भिडले. त्यामुळे संचारबंदी जारी करावी लागली. या 2 गटांमध्ये उफाळलेल्या हिंसाचारात तिघेजण ठार झालेत, तर 23 जण जखमी झालेत. रविवारी सकाळपासून सहारनपूर येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे तर आज दुपारी दोन्ही समाजांची शांतता बैठक आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, रॅपिड ऍक्शन फोर्स, पीएसी, सीआरपीएफच्या 13 दलं तैनात करण्यात आली आहेत. केंद्र सरकारतर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अखिलेश यादव सरकारला दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close