रितेशचा लय भारी दुनियादारीवर पडला भारी

July 27, 2014 5:08 PM0 commentsViews: 12315

ritesh deshmukh

27  जुलै :  रितेश देशमुखचा ‘लय भारी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. आतापर्यंत ‘लय भारी’ने 27 कोटींचा गल्ला जमवला आहे. या रेकॉर्डसोबतचं ‘लय भारी’ने ‘दुनियादारी’चा बॉक्स ऑफिसवरचा रेकॉर्डही मोडला आहे. दुनियादारीने 26 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली होती. अर्थात ‘लय भारी’च्या बॉलिवुड मसाल्याला मराठी प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.

याआधी दुनियादारी, टाईमपास, फँड्री या सिनेमांनी कमाईची कोटीच्या कोटी उड्डाणे केली आहेत. अभिनेता रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेला ‘लय भारी’ सिनेमाने पहिल्याच आठवड्यात कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘लय भारी’ चित्रपटाने 11 जुलैला प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 3 कोटी 10 लाख रुपयांची विक्रमी कमाई करत ‘टाईमपास’ आणि ‘दुनियादारी’ या चित्रपटांचे पहिल्या दिवसाचे विक्रम मोडीत काढले होते. आता आगामी काळात ‘लय भारी’ सिनेमा ‘टाईमपास’च्या 37 कोटी कमाईचा रेकॉर्ड मोडत नवा इतिहास रचतो का? ते पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close