पाक सरकारसमोर शरणागती नाही – तालिबानचं स्पष्टिकरण

May 4, 2009 9:04 AM0 commentsViews: 5

4 मे कोणत्याही परिस्थितीत पाक सरकारसमोर शस्त्रं खाली ठेवणार नाही, असं तालिबाननं स्पष्ट केलं आहे. तालिबान अतिरेक्यांनी स्वातजवळच्या बुनेरमध्ये दोन हजार लोकांना ओलिस ठेवलं आहे. मानवी ढाल म्हणून त्यांचा वापर करण्याचा तालिबानचा इरादा आहे. दरम्यान, पाकिस्ताननं तालिबानविरोधात लष्करी कारवाई तीव्र केली आहे. एकट्या बुनेरमध्ये अजूनपर्यंत 80 तालिबानी अतिरेक्यांना ठार केल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. पाकिस्तान तालिबानांच्या ताब्यात जाणार का याची भीती जगातल्या सगळ्याच देशांना आहे. विशेषतः भारत ह्या सर्व कारवायांवर बारीक नजर ठेवून आहे. तालिबाननं स्वात प्रांतात शरियत कायदा लागू केला. स्वातमध्ये इस्लामी कायद्याचा अमल सुरू झाला. आणि स्वात पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात गेलं. त्यानंतर तालिबानचं पुढचं टार्गेट होतं बुनेर. बुनेर इस्लामाबादपासून फक्त 100 किलोमीटरवर आहे. त्यामुळं तालिबानचा धोका, पाकिस्तानच्या अगदी गळ्यापर्यंत आला होता. त्यामुळं शेवटी पाकिस्तान सरकारनं, तालिबानविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पाक सरकारच्या दबावानंतर, तालिबाननं बुनेरमधून माघार घ्यायची तयारी दाखवली होती. पण आतालष्कर आणि तालिबान्यांमधला संघर्षही अटळ असल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानमध्ये वाढते दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी, तालिबानविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय, पाकिस्तान सरकारनं घेतला आहे.पाकिस्तान आता तालिबानविरुद्ध लष्करी कारवाई करायला सुरुवात केली आहे. तिकडे अमेरिकेनंही पाकिस्तानच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केलीये. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान कट्टरपंथीयांच्या हाती पडण्याचा धोका असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.

close