अनिल अंबानींच्या चॉपर घातपात कट प्रकरणी दोन जणांना अटक

May 4, 2009 11:39 AM0 commentsViews: 2

2 मेउद्योगपती अनिल अंबानी यांच्या चॉपरच्या घातपात कट प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. उदय वरेकर आणि बलराज थेवर अशी त्यांची नावं आहेत. हे दोघेही एअरवर्क्स इंजिनीअरिंग कंपनीतले कर्मचारी आहेत. अनिल अंबानी यांच्या चॉपरच्या घातपात कट प्रकरणी संशयितांमधे या दोघांना मुंबई क्राइम ब्रँचने अटक केली आहे. याप्रकरणी 50 ते 60 लोकांकडून चौकशी करण्यात आली असून या दोघांना आरोपी म्हणून अटक करण्यात आल्याचं समजतंय. तरीही अंबानी यांच्या चॉपरमध्ये दगड आणि चिखल कुणी टाकला होता, याचा गुंता अजून सुटलेला नाही. त्याचबरोबर या प्रकरणातले मुख्य साक्षीदार भरत बोरगे यांच्या मृत्यूचं गूढही कायम आहे.

close