प्रो ‘कबड्डी’ लीगची ग्लॅमरस सुरुवात

July 28, 2014 10:07 AM0 commentsViews: 6027

28  जुलै :  मुंबईतल्या वरळीत शनिवारपासून प्रो कबड्डी लीगची शानदार सुरुवात झाली. या लीगची पहिली मॅच यू मुंबा आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर यांच्यात खेळण्यात आली. अभिषेक बच्चनची टीम जयपूर पिंक पँथरचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अमिताभ बच्चन ऐश्वर्या राय बच्चनसह सर्व बच्चन कुटुंबीय उपस्थित होते. तसेच, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, आमिर खान, शाहरूख खान, सुनील शेट्टी, कबीर बेदी, सोनाली बेंद्रे अशा अनेक सेलिब्रिटीनी या खेळाला हजेरी लावली. सामन्याच्या पहिल्याच दिवशी जयपूर पिंक पँथरचा पराभवाचा करत यू मुंबाने या सामन्यात 45-31 असा विजय मिळवून या लीगची धमाकेदार सुरुवात केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close