नेपाळ माओवादी पक्षाचे पंतप्रधान प्रचंड यांचा राजीनामा

May 4, 2009 1:34 PM0 commentsViews: 9

2 मेनेपाळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. माओवाद्यांचं सरकार अवघ्या सहा महिन्यांतच कोसळलंय. नेपाळचे माओवादी पक्षाचे पंतप्रधान प्रचंड यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिलाय. लष्करप्रमुख जनरल रुकमंगद कटवाल यांना प्रचंड यांनी बडतर्फ केलं होतं. पण राष्ट्राध्यक्ष राम बरन यादव यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं नाही. सत्ताधारी आघाडीचे 4 पक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसनं या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. दरम्यान, राष्ट्राध्यक्षांची कृती घटनाबाह्य असल्याचा आरोप प्रचंड यांनी केलाय. त्यांनी टीव्हीवर राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे.

close