महाराष्ट्र दिनानिमित्त नेहरू सेंटरमधे ‘मेघदूता’चं मराठीत सादरीकरण

May 4, 2009 3:21 PM0 commentsViews: 42

4 मे , रचना सकपाळ महाराष्ट्र दिनानिमित्त नेहरू सेंटरमधे मेघदूत या महाकाव्याचं मराठीत सादरीकरण झालं. आजवर कवी कालिदास रचित संस्कृतमधील 'मेघदूत एक महाकाव्य' आणि कुसुमाग्रजांनी मराठीत अनुवादित केलेलं मेघदूत सर्वतोपरिचित आहे. पण या कार्यक्रमात ओडिसी नृत्यप्रकारातून सादर केलेलं हे पहिलंवहिलं मराठी मेघदूत यानिमित्ताने रसिकांना पाहता आलं. या अनोख्या प्रयोगशीलतेविषयी विचारलं असता 'ओडिसीत नटी सूत्रधार बोलतात, पण नाचत नाहीत इथे मी नाचायला लावलं', असं नृत्य दिग्दर्शिका झेलम परांंजपे यांनी सांगितलं.मूळ संस्कृतात असलेल्या मेघदूताचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झालाय. परंतु कुसुमाग्रजांनी मराठीत अनुवाद केलेलंच मेघदूत यावेळी सादर करण्यात आलंं. पण महाराष्ट्र दिनानिमित्त कालिदासाचीच निवड करण्यामागचं कारण काय अशी विचारणा केली असता 'कालिदास महाराष्ट्रात कसा आला, मेघदूत कसं रचलं गेलं याचा प्रवास आणि त्याचबरोबर त्याला महाराष्ट्रीय म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न या नृत्याविष्कारातून मांडण्यात आलाय ', असं नेहरू सेंटरचे संचालक एल.ए.काझी म्हणाले. तनामनाची लाही-लाही करणार्‍या तप्त वातावरणातही मेघदूताच्या या सादरीकरणामुळे पावसाचा गारवा अनुभवण्याचा अनोखा आनंद यावेळी रसिकांनी घेतला.

close