मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात संततधार पाऊस

July 28, 2014 12:15 PM0 commentsViews: 1336

India Mansoon

28  जुलै :  मुंबईसह ठाणे, कोकण, विदर्भ, मराठवाड्यातल्या विविध भागात सोमवारी पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने मुंबईत येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. सकाळी साडेपाचवाजेपर्यंत कुलाबा वेधशाळेत 72 मिलीमीटर तर सांताक्रूझमध्ये 116 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावली आहे. मुंबई, मुंबई उपनगरासह ठाणे, कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. हाजी अली, परळ आणि चेंबूर या भागांमध्ये पाणी साचलं असलं तरी वाहतूक सुरळीत असल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेनं केला आहे.

नवी मुंबईत काल रात्रीपर्यंत मुसळधार पाऊस होता. सकाळी थोडी विश्रांती घेऊन पावसाची रिमझिम सुरू आहे. हार्बर लाईन आणि ट्रान्स हार्बर लाईन वरील लोकल सेवा 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे. तर नेरुळ-शेरवणे परिसरात काही प्रमाणात पाणी साचलं होतं. आता पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केट आणि धान्य मार्केटमध्ये पाणी साचलं आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close