अशोक चव्हाणांना दिलासा, निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती

July 28, 2014 1:35 PM0 commentsViews: 744

ashok chavan
28   जुलै :   दिल्ली हायकोर्टाने निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती देत काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाणांना दिलासा दिला आहे. यावेळी दिल्ली हायकोर्टानं चव्हाण यांच्याविरोधात तक्रार दाखल करणारे मूळ याचिकाकर्त्यांना नोटीस बजावली. मुक्तार अब्बास नक्वी, किरीट सोमैया, माधव किन्हाळकर यांनी अशोक चव्हाणांविरोधात याचिका दाखल केली होती. या सर्वांना उत्तर देण्यासाठी हायकोर्टानं 2 आठवड्यांची मुदत दिली आहे.

2009च्या विधानसभा निवडणुकीचा खर्च अयोग्य पद्धतीने दाखवल्याबद्दल निवडणूक आयोगाने ही नोटीस बजावली होती. या नोटीसमुळे अशोक चव्हाणांची खासदारकी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली होती. कायदेशीर सल्ला घेऊन या नोटिशीला 20 दिवसात उत्तर द्या, असेही आयोगाने सांगितले होते.  आयोगाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीला अशोक चव्हाण यांनी दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं होतं.  त्यावर आज सुनावणी झाली असून दिल्ली हायकोर्टाने अशोक चव्हाणांना दिलासा दिला आहे.  या सर्वांना उत्तर देण्यासाठी हायकोर्टानं 2 आठवड्यांची मुदत दिली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close