मुंबईकरांना खड्‌ड्यात ढकलणारं रॅकेट उद्‌ध्वस्त करा -राज ठाकरे

July 28, 2014 4:03 PM1 commentViews: 4112

109raj_on_modi28 जुलै : मुंबई महापालिकेचं काम अचाटच आहे. खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटं दिली जातात. ज्या मार्गांवरुन अवजड वाहनं जातात त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक लावले जातात जी टीकत नाही. दोन महिन्यात उखडली जातात हे सगळं रॅकेट असून ते उधळवून लावलं पाहिजे असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय. तसंच फूटपाथवर अनधिकृत फेरीवाले बसवले जातात ते उद्‌ध्वस्त केले पाहिजे. ज्याच्यासाठी ही संघटना उभी केली त्यासाठी काम होत नसून दुसर्‍याच गोष्टीकडे लक्ष्य दिलं जात नाही अशी कानउघडणीही राज यांनी कार्यकर्त्यांची केली. मुंबईमध्ये मनसे पदाधिकार्‍यांची बैठक झाली. त्यावेळी राज बोलत होते. मागील आठवड्यातही राज यांनी पत्रकार परिषद घेऊन फेरीवाला आणि झोपडपट्टी धोरणाला विरोध दर्शवला होता. आज पुन्हा एकदा राज यांनी फेरीवाल्यांना टार्गेट करत अनधिकृत फेरीवाल्यांना उद्‌ध्वस्त करा अशी सुचना मनसेसैनिकांना केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Siddhesh Patade

    Raj Saheb Thakare Aap Aage Badho, Hum Tumhare Sath Hai.
    JAI MANASE

close