कसा पिसारा फुलला…

July 28, 2014 4:26 PM0 commentsViews: 2186

peacock

28 जुलै : ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात… नाच रे मोर नाच’ हे लहानपणी ऐकलेलं मोराच गाणं सर्वांच्या ओळखीचं आहे. पण खूप कमी लोकांना हे नाचणारे मोर पाहण्याची संधी मिळते. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील चिंचोली गावात राज्यातील सर्वात जास्त मोर असल्याने या गावाची ओळख मोराची चिंचोली अशीच पडली.

इथे मोरांना अगदी जवळून पाहाण्याची संधी मिळते पण यंदा पाऊस कमी झाल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बंधारे, छोटे ओढे कोरडे पडल्याने मोरांना नैसर्गिक खाद्य उपलब्ध होत नाहीत. इथल्या आनंद ‘अग्रो टुरिझम’च्या आनंद थोपटे यांच्या शेतात अगदी मुक्तपणे मोरांना जवळून पाहायला मिळते. अगदी साध्या पद्धतीने उभारलेल्या या पर्यटन केंद्रावर पुणे मुंबई वरून आलेल्या काही पर्यटकांनी खास रविवारची सुट्टी इथे घालवली मोठ्यांनी बैलगाडीतून रपेट मारली तर छोट्यांनी झोक्याचा आनंद घेतला. सोबतीला गरमा गरम कांदा भज्जीची मजा काही औरचं… पण पाऊस येणार म्हणून नाचणारे मोर पाहण्याची संधी चालून आलीच. मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने मोरांमध्ये नेहमी इतका उत्साह नाही. त्यामुळे मोराच्या चिंचोलीला सुधा पावसाची प्रतिक्षा आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close