ICICI बँकेच्या एमडी आणि सीईओ पदी चंदा कोचर

May 4, 2009 4:17 PM0 commentsViews: 8

4 मे, चंदा कोचर यांनी आज सोमवारपासून ICICI बँकेच्या एमडी आणि सीईओ म्हणून कार्यभार स्विकारलाय. याबद्दल त्यांना विचारलं असता 'यापुढच्या पाच वषांर्त या नव्या जबाबदारीसह अनेक आव्हानंही असतील', असं त्यांनी नेटवर्क 18शी बोलताना सांगितलं. ICICI बँकेचे याआधीचे सीईओ आणि एमडी के.व्ही.कामत यांच्यानंतर चंदा कोचर यांच्याकडे हे पद सोपवण्यात आलं होतं. चंदा कोचर यांनी 1984 सालापासून ICICI बँकेत विविध पदं भूषवली आहेत. ICICI बँक देशातली सर्वात दुसरी मोठी खाजगी बँक मानली जाते. यापुढे ICICI बँकेच्या एमडी आणि सीईओ पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला असल्याचं समजतंय.

close