यूपीएससी परीक्षेचा राडा, परिक्षार्थींनी प्रवेशपत्रं जाळली

July 28, 2014 6:00 PM0 commentsViews: 523

32upsc_exam28 जुलै : यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेचा वाद आणखी चिघळला आहे. यूपीएससीच्या आंदोलनकर्त्या परिक्षार्थींनी आपली प्रवेशपत्रं जाळून टाकली आहे.

आजही दिल्लीत यूपीएससी भवनाच्या बाहेर विद्यार्थ्यांनी निदर्शनंही केली. या प्रकरणी राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी गृहमंत्री राजनाथ सिंग आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतलीय.

दरम्यान, पूर्वपरीक्षेच्या तारखा गरज असल्यास बदलल्या जातील, अशी माहिती सूत्रांकडून समजतेय.

यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचं 4 दिवसापासून उपोषण सुरू आहे. विद्यार्थ्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींची भेटही घेतलीय. मात्र अजूनही तोडगा अजून निघालेला नाहीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close