महायुतीची बैठक कुठल्याही निर्णयाविना संपली

July 28, 2014 6:10 PM0 commentsViews: 1323

mahayuti_meeting28 जुलै : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महायुतीची बैठक आज (सोमवारी) पार पडली मात्र या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. याबाबतची पुढची बैठक 5 किंवा 6 ऑगस्टला होणार आहे. कुठल्या मुद्द्यांवर जागावाटप व्हावं यावर बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीत शिवसेनेचे सुभाष देसाई, संजय राऊत, दिवाकर रावते आणि रामदास कदम तर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. तर मित्रपक्षांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेटटी, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विनायक मेटे, सुमंतराव गायकवाड आणि अविनाश महातेकर हे नेते उपस्थित होते.

मागिल आठवड्यातही युतीची बैठक पार पडली होती. पण या बैठकीला सेना आणि भाजपचेच नेते उपस्थित होते. आज घेण्यात आलेल्या बैठकीला घटक पक्षांनीही निमंत्रण देण्यात आलं. पण जागावाटपावर कोणतीही चर्चा झाली नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close