भले शाब्बास, जितू रायने पटकावले गोल्ड मेडल

July 28, 2014 6:34 PM1 commentViews: 695

jitu28 जुलै : ग्लासगोव्ह इथं सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची घौडदौड सुरूच आहे. आज भारताला 7 वं गोल्ड मिळालंय. भारताच्या जितू रायनं 50 मीटर पिस्तुल प्रकारात गोल्ड मेडल पटकावलंय.

तर याच प्रकारात गुरपाल सिंगला सिल्व्हर मेडल मिळालंय. जितू रायच्या यशामुळे भारताच्या खात्यात सात गोल्ड मेडल जमा झाले आहे. तर दुसरीकडे ऑलिम्पिक ब्राँझ मेडल विजेता नेमबाज गगन नारंगने पुरूष गटात 50 मीटर रायफल स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावले आहे.

नारंगने रायफल स्पर्धेत 620.5 गूण मिळवत तिसरे स्थान पटकावले आणि फायनलमध्ये जागा मिळवली. नारंगने फायनलमध्ये वेध साधत सिल्व्हर मेडल पटकावले आहे. मात्र नेमबाज जॉयदीप करमाकरचे फायनल गाठण्याचे स्वप्न अधूरे राहिले. करमाकर 617 गूण मिळवून नव्या स्थानावर समाधान मानावे लागले. आतापर्यंत भारताच्या खात्यात 7 गोल्ड, 11 सिल्व्हर आणि 7 ब्राँझ मेडल जमा झाले आहेत.

कॉमनवेल्थमध्ये मेडलची लयलूट

  • 07 – गोल्ड मेडल
  • 11 – सिल्व्हर मेडल
  • 07 -ब्राँझ मेडल

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Anil Jadhav

    क्रीडाविषयक बातम्या देताना मराठी भाषेची वाट का लावली जाते? गोल्ड मेडल, सिल्वर आणि ब्राँझ यांच्याऐवजी सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक असे लिहिणे चांगले वाटत नाही का? कि हे शब्द ” down मार्केट” झालेत? कालही एक बातमी झळकत होती: इंग्लंडचा रन्सचा डोंगर.. अरे हे काय आहे? धावांचा डोंगर म्हटले तर काय TRP तळाला जाणार आहे का? जिथे गरज आहे तिथे इंग्रजी शब्द जरूर वापरावेत, पण म्हणून मराठी भाषेचे सौंदर्य ओरबाडू नये हीच विनंती.. पदकतालिका.. फलंदाज.. गोलंदाज असे शब्द वाचताना चांगलेच वाटतात.. पहिली इनिंग ऐवजी पहिला डाव, टेस्ट ऐवजी कसोटी असे शब्दप्रयोग भाषेची आणि पर्यायाने तुमची उंची वाढवतील..

close