मुरबाड-माळशेज मार्गावर भीषण अपघातात 4 ठार

July 28, 2014 7:28 PM0 commentsViews: 3691

murbad28 जुलै : मुरबाड – माळशेज मार्गावर भीषण अपघात झालाय यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी आहे. जखमींवर मुरबाड रूग्णालयात उपचार सुरू आहे.

टोकावडेहुन मुरबाडकडे प्रवासी वाहतूक करणारी वैशाखरे गावातील दिपक घरत यांच्या काळी पिवळी गाडीतून 13 प्रवासी मुरबाडच्या दिशेने प्रवास करीत होते. माळशेज राष्ट्रीय महामार्ग क्र.222 वरील वडाचापाडा गावा जवळ लोखंडी प्लेट घेवून जाणार्‍या कंटेनर जवळून गाडी गेली असता कंटेनरमधून बाहेर आलेल्या प्लेटने जीपचा पत्रा चिरून आतील चार प्रवाशांचा जीव घेतला तर पाच प्रवासी जखमी केले आहेत.

चारही मृत व्यक्ती टोकावडे परीसरातील असून नातेवाईकांनी व संतप्त जमावाने कंटेनरला आग लावली तसंच नातेवाईकांनी रास्ता रोकोही केला. त्यामुले मुरबाड, सरळगावपर्यंत वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. टोकावडे, किन्हवली, मुरबाड पोलिसांच्या तुकड्या हजर होवून जमावाला पांगविण्याचा केविलवाना प्रयत्न करीत परंतू संतप्त जमावापुढे तेही हतबळ झाले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close