मुंबईत 10 अतिरेक्यांची घुसखोरी : लष्कर-ए-तोयबाचा ई मेल

May 5, 2009 5:05 AM0 commentsViews: 2

5 मे, मुंबई दहा अतिरेकी मुंबईत घुसले असल्याचा ई-मेल लष्कर-ए-तोयबानं पाठवला आहे, अशी माहिती मुंबई काइम ब्रँचचे जॉइंट सी.पी. राकेश मारीया यांनी दिली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सेंजला तसा ई-मेल मिळाला आहे. त्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सेंजने ( एनएसई ) तो ई-मेल मुंबई पोलिसांना पाठवला असल्याचंही राकेश मारीया यांनी सांगितलं आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी बीएसई आणि एनएसई दोन्ही ठिकाणी घुसखोरी करून पाहणी केली, असाही दावा अतिरेक्यांनी ई-मेलमधून केला आहे. स्टॉक एक्सेंजच्या दोन्ही इमारती उडवून देऊ, अशी धमकीसुद्धा ई-मेलमध्ये देण्यात आली आहे. छुप्या पद्धतीनं खरंच अज्ञात व्यक्ती बीएसई आणि एनएसईमध्ये घुसल्या होत्या का याचा तपास आता मुंबई पोलीस करत आहेत.

close