…तर यूपीएससीची पूर्वपरीक्षा रद्द होण्याची शक्यता

July 28, 2014 10:43 PM0 commentsViews: 1488

upsc_exam_issiue28 जुलै : यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षेचं स्वरूप बदललं तर परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते. पण, यूपीएससीच्या समितीचे तीन सदस्य अहवाल सादर करत नाहीत तोपर्यंत कोणताही निर्णय होणार नाही. ही समिती या आठवड्यात अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.

यूपीएससी ही स्वायत्त संस्था आहे आणि परीक्षा पद्धती तसंच परीक्षांच्या तारखा याबद्दलचा अंतिम निर्णय यूपीएससीच घेईल, असं स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान, या वादावर या आठवड्यापर्यंत तोडगा निघेल अशी सरकारला आशा आहे. याबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आपली भूमिका मांडलीय. आठवड्याभरात यावर तोडगा निघेल.

पुढच्या काही दिवसात समितीचा अहवाल येईल, असं मला वाटतंय. परीक्षा पुढे ढकलली जाईल का, यावर आताच काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. ऍडमिट कार्ड्स आलेत. समितीच्या अहवालाची वाट बघा. पंतप्रधानांनी मला या वादावर तातडीनं तोडगा काढायला सांगितलंय असं सिंह म्हणाले.

दरम्यान, यूपीएससीचे उमेदवार आज अधिक आक्रमक झाले. त्यांनी यूपीएससी भवनाबाहेर प्रवेश पत्र जाळले. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. सध्याची ऍप्टीट्युड टेस्ट रद्द करावी, अशी त्यांची मागणी आहे. बिगर इंग्रजी परीक्षार्थ्यांसाठी ही टेस्ट पक्षपाती असल्याचं या उमेदवारांचं म्हणणं आहे. या आंदोलकांनी आज काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली. याबाबत सरकारशी चर्चा करण्याचं आश्वासन राहुल गांधींनी दिलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close