लालबाग ब्रीज तोडण्याचं काम सुरू

May 5, 2009 5:59 AM0 commentsViews: 5

5 मे, मुंबई मुंबईत राणीबागेपासून परळच्या आयटीसी हॉटेलपर्यंत नवा दुहेरी ओव्हर ब्रीज बनवण्याचं काम होत असल्याने लालबागचा जुना ब्रीज तोडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हानवा ब्रीज बांधल्यावर वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे तसंच मोठ्या उंचीचे गणपतीही ब्रीज खालून नेणं सोयीचं होणार असल्याचा दावा शासनाने केला आहे. येत्या 25 मेपर्यंत हा नवा ब्रीज बनवून पूर्ण होणार असल्याची हमी महाराष्ट्र शासनाच्या अधिका-यांनी दिली आहे.लालाबगच्या जुना ब्रीज तोडण्यात आल्याने वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. दत्ताराम लाड ते भारतमातापर्यंतची वाहतूक बंद करून ती ग.द.आंबेकर आणि ना. म. जोशी मार्गाने वळवण्यात आली आहे. इतरही काही पर्यायी रस्त्यांनी वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी पेक्षाही आता वाहतुकीची सर्वात जास्त कोंडी होत आहे. परिणामी नवा ब्रीज तयार झाल्यावर वाहतुकीची कोंडी होणार नसल्याची आशा बाळगली जात आहे.

close