धनगर आरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सोडलं

July 29, 2014 3:15 PM0 commentsViews: 2863

dhangar_fast_end29 जुलै : धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करावा या मागणी बारामतीमध्ये गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेलं धनगर आरक्षण कृती समितीचं बेमुदत उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय.

समितीच्या कार्यकर्त्यांनी उसाचा रस घेऊन उपोषण सोडलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे.

सोमवारी पुणे महसूल विभागाचे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी उपोषणकर्ते आणि आरक्षण कृती समितीची चर्चा केली आणि त्यानंतर उपोषण सोडण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

मात्र उपोषण आपलं मागे घेतलं असलं तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचंही समितीने सांि

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close