हॅपी बर्थ डे वाघोबा, चंद्रपुरात फुलला वाघोबांचा संसार !

July 29, 2014 3:47 PM0 commentsViews: 805

महेश तिवारी, चंद्रपूर

29 जुलै : देशभरात वाघांची संख्या कमी होत असताना चंद्रपूर जिल्ह्यात मात्र 110 वाघांची नोंद झाली आहे. वाघांच्या 32 बछड्यांसोबतच 110 वाघांच्या उपस्थितीमुळे चंद्रपूर जिल्ह्याची ‘दी लॉड आफ टायगर’ अशी ओळख व्याघ्रभूमी अशी झालीय. व्याघ्र दिनानिमित्त हा स्पेशल रिपोर्ट

chadrapur_tigerकोळशाच्या खाणी औष्णिक वीज प्रकल्प वाढते औद्योगिकरणामुळे देशातला सर्वाधिक प्रदुषित जिल्हा अशी ओळख असलेल्या या
जिल्हयाची आता नवी ओळख तयार होत आहे,. ती म्हणजे पट्टेदार वाघामुळे चंद्रपूर जिल्ह्यात देश विदेशातल्या पर्यटकाना आकर्षित करणार्‍या ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर आणि बफर झोनमध्ये तब्बल 65 वाघ आहेत या जिल्ह्यातील जंगल ताडोबा ब्रम्हपुरी मध्यचांदा तसेच चंद्रपूर अशा तीन विभागात विभागले गेलेय ताडोबातल्या 65 वाघासह ब्रम्हपुरी वनविभागात 23 चंद्रपुरात 10 तर मध्यचांदा वनविभागात 12 अशा 110 वाघांचं अस्तित्व आढळून आलंय. उल्लेखनीय म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडेच वाघांच्या 32 बछडी आढळल्याने पर्यटकांच्या दृष्टीने चंद्रपूर व्याघ्रभूमी बनली आहे.

ताडोबासह संपूर्ण जिल्ह्यात वाघांची संख्या जास्त असल्याने शिकार्‍यांच्या टोळीने 2011 /12 मध्ये काही वाघांची शिकार केली होती तर काही वाघांकडून नागरीकांना ठार मारण्याच्या घटना घडल्यानंतर जंगल परिसरात राहणारे नागरिक आणि वाघ यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. या पाश्‍र्वभूमीवर वाघांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यात वनखात्यासमोर मोठी आव्हानं आहेत. वन्यजीवप्रेमी आणि या क्षेत्रात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांनीही वाघांच्या संवर्धनात हातभार लावण्याची जबाबदारी उचललीय.

चंद्रपूरमध्ये ताडोबासह संपुर्ण जिल्हयातील बांबुच जंगल वाघांच्या प्रजननासाठी उपयुक्त असल्याने वाघांची संख्या वाढण्यासाठी चंद्रपुरातलं वातावरण उपयुक्त ठरलंय तर वाघांच्या शिकारी रोखण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न होत असले तरी वाघांच्या 32 बछडयांच्या देखभालीसाठी विशेष लक्ष देण्याची वन्यजीप्रेमींची मागणी आहे.

जिल्ह्यात वाघांच्या दर्शन सहज होत असल्याने चंद्रपुरातलं तापमान 47 अंशावर गेल असतानाही पर्यटकानी ताडोबाला मोठया प्रमाणात भेट दिली होती एकूणच चंद्रपुरच्या व्याघ्रभुमीने सर्वाधिक वाघांच्या वाढत्या संख्येने व्याघ्रप्रेमी सुखावले आहेत.

औष्णिक वीजप्रकल्प आणि कोळशाच्या खाणींमुळे प्रदूषित झालेला चंद्रपूर जिल्हा व्याघ्रभूमी ही आपली नवी ओळख अभिमानानं मिरवतोय. चंद्रपूरची ही ओळख अशीच राहावी, अशी अपेक्षा सगळ्यांनाच आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close