दिल्लीत लष्कर-ए-तोयबाच्या संशयित दहशतवाद्याला अटक

July 29, 2014 3:14 PM0 commentsViews: 656

delhi_terr_arrest29 जुलै : दिल्ली पोलिसांनी लष्कर -ए- तोयबाच्या संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. अब्दुल सुहान असं त्याचं नाव आहे. सुहान हा लष्कर ए तोयबाच्या जावेद बलुचीचा जवळचा सहकारी आहे.

गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमधल्या झालेल्या मुझफ्फरनगर दंगलींनंतर त्यानं दंगलग्रस्तांच्या छावणीला भेट दिली होती. सुहानच्या 2 सहकार्‍यांना गेल्या वर्षी अटक झाली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान दिल्लीवर दहशतवादी हल्ला करण्याचा डाव उघड झाला होता. या अगोदर सुहानला सीबीआयने अटक केली होती.

10 वर्ष शिक्षा भोगल्यानंतर 2011 मध्ये त्याची सुटका झाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार सुटकेनंतर सुहान परत लष्करच्या कारवायांमध्ये सक्रिय झाला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close