‘आरक्षित जमिनी द्या’

July 29, 2014 4:30 PM0 commentsViews: 29

29 जुलै : साधुग्रामच्या आरक्षित जमिनी परत द्या अशी आग्रही मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी केली आहे. अन्यथा नाशिकमध्ये कुंभमेळा भरवण्यात अर्थ नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. पुढल्या वर्षी नाशिकमध्ये गोदावरीकाठी सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. त्याच्या नियोजनासाठी जिल्हा
प्रशासनानं मुख्य आखाड्यांच्या महंतांना बैठकीसाठी बोलावलंय. यावेळी साधुग्रामच्या जमिनींचा मुद्दा गाजणार आहे. गेल्या सिंहस्थामध्ये साधुग्रामसाठी आरक्षित जमिनींवर
मधल्या 12 वर्षात बांधकामं उभी राहिलीत. मात्र, आखाडा परिषदेचा याला विरोध आहे. सोबतच सिंहस्था निमित्ताने नदीपात्राचं काँक्रिटीकरण करण्यासही त्यांनी विरोध केलाय. सिंहस्थाच्या नियोजनासाठी केंद्र सरकारकडून खूप अपेक्षा आहेत असंही ते आयबीएनशी बोलताना म्हणाले.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close