पुणे फरासखाना स्फोट सीसीटीव्हीमध्ये कैद

July 29, 2014 9:43 PM0 commentsViews: 5381

29 जुलै : पुण्यात 10 जुलैला फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात स्फोट झाला होता. हा स्फोट सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालाय. पोलीस स्टेशनच्या आवारात चोरीच्या मोटरसायकलमध्ये हा स्फोट झाला होता. तो पाईप बॉम्ब होता आणि त्याची क्षमता कमी होती, त्यामुळे या स्फोटात जीवितहानी झाली नाही अशी माहिती चौकशीतून समोर आलीय. पण, या व्यतिरिक्त पुढे कुठलाच सुगावा एटीएसच्या हाती लागलेला नाही. मात्र या स्फोटात तीनजण किरकोळ जखमी झाले होते. या स्फोटाचा तपास महाराष्ट्र एटीएस करतेय. जिथं हा स्फोट झाला त्याच्या समोरच्या दुकानातील सीसीटीव्हीत स्फोट बंदीस्त झालाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close