राष्ट्रवादीला एकही जागा वाढवून देणार नाही – ठाकरे

July 29, 2014 10:11 PM0 commentsViews: 1088

29 जुलै : जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा करण्याच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेचं स्वागत आहे पण राष्ट्रवादीला एकही जागा वाढवून देणार नाही असं ठामपणे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जागावाटबाबातची भूमिका स्पष्ट केलीय.

जागांच्या अदलाबदलीबद्दल बोलताना नवापूरची जागा सुरुपसिंह नाईकांचीच आहे आणि ती आता राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या शरद गावितांसाठी सोडण्याचा प्रश्नच नाही असंही माणिकरावांनी सांगितलं. तसंच नारायण राणेंसंदर्भात पक्षश्रेष्ठी लवकरच निर्णय घेतील असंही ठाकरे म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 144 जागांची मागणी केलीय. मात्र काँग्रेसने जागा वाढवून देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे मागिल शनिवारी राष्ट्रवादीची बैठक पार पडलीय. या बैठकीत राष्ट्रवादीने नरमाईची भूमिका घेत जागावाटपाबाबत दिल्लीत निर्णय घ्यावा अशी मागणी केलीय. पण आता माणिकरावांनी दिल्लीत चर्चा जरी करायची असेल तरी जागा वाढवून भेटणार नाही असं स्पष्ट केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close