कुर्ला- कलिन्यात फेर मतदानाला थंड प्रतिसाद

May 5, 2009 7:02 AM0 commentsViews: 5

5 मे, मुंबई उत्तर-मध्य मुंबईतल्या कर्ला-कलिना परिसरातल्या चार मतदान केंद्रांवरच्या फेर मतदानाला नागरिकांचा थंड प्रतिसाद मिळाला आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. आजचा वर्किंग डे पाहता फार कमी नागरिकांनी परिसरांत मतदान केलं आहे.गेल्या गुरुवारी 30 एप्रिलला राज्यात आणि देशात ज्याज्या ठिकाणी तिस-या टप्प्यातलं मतदान झालं होतं त्यात उत्तर-मध्य मुंबई या मतदारसंघातल्या कुर्ला-कलिना परिसरातल्या चार मतदान केंद्रांचा समावेश होता. मतदान यंत्रातला तांत्रिक बिघाड तसंच या मतदान केंद्रांवर झालेल्या सर्वाधिक मतदानावर बोगस मतदानाची शक्यता ठेवून फेर मतदान घेण्यात आलं.

close