भारताचा ‘दस का दम’, कुस्तीतही ‘गोल्डन’ हॅटट्रिक

July 29, 2014 11:13 PM0 commentsViews: 2646

india_win29 जुलै : ग्लासगोव्ह इथं सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने ‘दस का दम’ दाखवत खणखणीत 10 सुवर्णपदकं पटकावली आहेत.
भारताचा स्टार कुस्तीपटू सुशील कुमारने पाकिस्तानी कुस्तीपटू कमर अब्बासला धूळ चारत सुवर्णपदक पटकावले आहे.

सुशीलकुमारने सहा गूण घेऊन सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. त्याचं हे वैयक्तिकरीत्या मिळवलेलं 2 रं सुवर्णपदक आहे. त्याचबरोबर अमित कुमारनेही 57किलो कुस्तीगटात सुवर्णपदक पटकावलंय.

याशिवाय विनेशने महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलंय. तिनं इंग्लंडच्या रॅटिगनचा पराभव केला. तर दुसरीकडे कॉमनवेल्थमध्ये महिलांची घोडदौड कायम आहे.

50 मीटर रायफल स्पर्धेत लज्जा गोस्वामीला कास्य पदक मिळवले आहे. भारतीय खेळाडूंच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने कॉमनवेल्थ गेम्समध्ये आतापर्यंत 34 पदकं मिळवली आहेत.

कॉमनवेल्थमध्ये भारताचा वाटा

  • सुवर्णपदक – 10
  • रौप्यपदक –  14
  • कास्यपदक – 10

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close