अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी आजपासून भारत दौर्‍यावर

July 30, 2014 10:26 AM0 commentsViews: 622

JOhn kerry

30  जुलै :  अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आजपासून भारत दौर्‍यावर येत आहेत. जॉन केरी आज रात्री नवी दिल्लीत पोहोचणार. भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमधला हा मोठ्या परिवर्तनाचा क्षण आहे, असं केरी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेला भेट देणार असून, याची पायाभरणी या दौर्‍यामुळे होणार आहे. त्यामुळे केरी यांचा हा दौरा अमेरिका आणि भारत यांच्या संबंधांतील महत्त्वाचा असणार आहे. जॉन केरी उद्या पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेणार आहेत. तसेच, भारतातील नव्या सरकार स्थापनेनंतर अमेरिकी अधिकार्‍यांसोबत मंत्रिस्तरावरील पहिल्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या वेळी दिलेल्या ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणेतील दूरदृष्टीचा केरी यांनी कौतुक केलं आहे. भारतातील नव्या सरकारने ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेतून मांडलेल्या संकल्पनाला आम्ही पाठिंबा देऊ इच्छितो. हा एक चांगला दृष्टिकोन असल्याचे केरी यांनी सांगितले. सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस या थिंक टँकने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close