‘किक’ची 100 कोटींकडे वाटचाल…

July 30, 2014 1:59 PM0 commentsViews: 1308

kick04-jun16

30  जुलै :  ईद हा सण बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानसाठी नेहमीच लकी ठरला आहे. मुहूर्त साधून रिलीज झालेल्या ‘किक’ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तेलुगू सिनेमाचा रिमेक असलेला ‘किक’ 25 जुलैला म्हणजेच गेल्या शुक्रवारी रिलीज झाला. या सिनेमाने फक्त 5 दिवसांमध्ये 98.14 कोटींपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे ‘किक’ आता लवकरच 100 कोटींचा पल्ला पार करणार हे नक्की.

सलमानसह जॅकलीन फर्नांडिस, रणदीप हुडा आणि नवाझुद्दीन सिद्धिकी यांच्या भूमिका असलेल्या या सिनेमाने पहिल्या 2 दिवसांतच 50 कोटींचा गल्ला जमवला होता तर पहिल्या दिवशी या चित्रपटाने 27 कोटींची कमाई केली होती.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close