युपीएससीत अनिकेत मांडवगणेची बाजी

May 5, 2009 5:25 AM0 commentsViews: 7

5 मे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (युपीएससी) पुण्याच्या अनिकेत मांडवगणेनं बाजी मारली आहे. अनिकेत मांडवगणे या युपीएससीच्या ओबीसी कॅटेगिरीत राज्यात पाहिला आला आहे तर देशातल्या गुणवत्ता यादीत तो 29 वा आला आहे. अहमदनगरची शीतल उगले राज्यात दुसरी आणि देशातून 37 वी आली आहे. शीतल उगले पुणे विद्यापीठाची राज्यशास्त्राची गोल्ड मेडलिस्ट आहे. अनिकेतने आपण फॉरिन सव्हिर्सेस मध्ये जाणार असल्याचं सांगितलं. सोलापूर जिल्ह्यातल्या वडार समाजातील 25 वर्षांचा बालाजी मुंजळे हा युपीएससीच्या राष्ट्रीय गुणवत्ता यादीत 56 वा आला आहे. युपीएससीच्या परीक्षेत देशात पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी वर्चस्व मिळवलं आहे. युपीएससीच्या परीक्षेत देशात सर्वप्रथम येण्याचा मान नोएडाच्या शुभ्रा सक्सेनानं पटकावला आहे. शरणदीप कौर ब्रार दुसरी तर किरण कौशल यादीत तिसरी आली आहे. या परीक्षेत एकूण 791 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी 364 खुल्या प्रवर्गातले तर 236 ओबीसी प्रवर्गातले आहेत. मागास प्रवर्गातील 130 तर एसटी प्रवर्गातील 61 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

close