नव्या पालघर जिल्ह्याविरोधात याचिका दाखल

July 30, 2014 4:55 PM0 commentsViews: 840

palgahar330 जुलै : ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून नवा पालघर जिल्हा 1 ऑगस्टला निर्माण होतोय. त्याविरोधात येत्या सोमवारी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागातल्या स्थानिक राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ही याचिका दाखल केलीय.

आदिवासी भागांना डावलून पालघरला मुख्यालय केल्याचा राज्य सरकारचा हा निर्णय राजकीय असल्याचं या याचिकेत मांडण्यात आलंय. त्यामुळे राजकीय पद्धतीने केलेलं हे विभाजन रद्द करण्यात यावं अशी या याचिकेत मागणी करण्यात आली आहे.

जव्हार, विक्रमगड भागातल्या एकूण 33 जणांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केलीय. यात सीपीआयचे आमदार राजा नाथू ओझरे, खासदार लहानू शिवडा कोम, आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळुराम दोढदे यांचा समावेश आहे. या याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close