माळीण गाव दुर्घटनेआधी आणि दुर्घटनेनंतर

July 30, 2014 6:23 PM0 commentsViews: 5969

malin_after_before30 जुलै : पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरजवळ माळीण गाव…निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं 50 ते 60 घरांचं हिरवगार गाव…मात्र आजची पहाट माळीणच्या गावकर्‍यांसाठी अंधारमय ठरली. पहाटेच्या साखर झोपेत असलेल्या गावकर्‍यांशी निसर्गाने क्रुर चेष्टा केली. नेहमीप्रमाणे पावसाने माळीण गावाला झोडपून काढलं. हा पाऊसही गावकर्‍यांच्या सवयींचा झालेला. डोंगरपायथ्याशी वसलेलं निसर्गरम्य हे गाव ज्या डोंगराने कुशीत घेतलं तोच डोंगर गावावर कोसळला. डोंगरकडा कोसळल्यामुळे 44 घरं ढिगाराखाली दबली गेलीय.

आतापर्यंत या दुर्घटनेत 25 जणांचा मृत्यू झालाय. तर 100 जण अजूनही अडकलेले आहे. माणसं तर अडकलीच पण मुकी जनावरही या ढिगाराखाली गाडली गेलीय. अनेकांचं संसार उद्‌ध्वस्त झाले. या अस्मानी संकटामुळे गावकर्‍यांवर दुखाचा डोंगर कोसळलाय. आता आमच्याकडे काही राहिलं नाही जे होत त्याचं नव्हतंय झालं आम्ही काय करावं असं दुख इथले गावकरी व्यक्त करत आहे.

घटनास्थळावर बचावकार्य पोहचलंय. ढिगार हटवण्याचा काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. घटनास्थळाकडे केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते रवाना झाले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close