डावे पाठिंबा देतील – राहुल गांधींचा विश्वास

May 5, 2009 9:46 AM0 commentsViews:

5 मेनिवडणुकानंतर डावे पाठिंबा देतील, असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांनी दिल्लीत व्यक्त केला. हा विश्वास व्यक्त करताना केंद्रात युपीएचंच सरकार येणार आणि भाजपप्रणीत एनडीए आघाडीला संसदेत विरोधी बाकांवर बसावं लागेल असंही राहुल गांधी ठामपणे म्हणाले. निवडणुकीनंतर सगळे सेक्युलर पक्ष एकत्र येतील असं बोलताना निवडणुकीनंतर आम्हाला डावे पाठिंबा देतील, असे संकेत राहुल गांधी यांनी देताना मनमोहन सिंग हेत उत्तम पंतप्रधान आहेत याचा त्यांनी पुनरुच्चार केला. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला 2004 पेक्षाही जास्त जागा मिळतील, असं भाकीत राहुल गांधी यांनी केलं. हे भाकित करताना निवडणूक निकालानंतर आघाड्यांचे सर्व पर्याय खुले असतील असंही राहुल यांचं म्हणणं पडलं. डाव्यांचा पाठिंबा मिळेल असं राहुल गांधींना वाटत असलं तरी या शक्यतेचा डाव्यांनीच इन्कार केला आहे. यावेळी पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं सीपीआयचे महासचिव ए.बी.बर्धन यांनी स्पष्ट केलंय.

close