उजनी धरणातला पाणीसाठा संपण्याची शक्यता

May 5, 2009 9:51 AM0 commentsViews: 7

5 मे सोलापूरला पाणीपुरवठा करणा-या उजनी धरणात केवळ बावीस टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय. हा पाणीसाठा मे महिन्याअखेर संपण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यांत उजनी धरणांत साठ टक्के पाणीसाठा होता. मात्र नियोजन न करता धरणातील पाणी मोठ्या प्रमाणांत वापरल्यानं, पाणीसाठा बावीस टक्क्यावर आला आहे. गेल्या वर्षीही नियोजनाशिवाय पाणी वापरल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला होता. यावर्षीही तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मे महिन्यानंतर या धरणात पाण्याच्या मृतसाठ्याचा पिण्यासाठी वापर करता येणार नाही. जून- जुलैमधे जर पावसानं दडी मारली , तर सोलापुरात पाण्याची परिस्थिती बिकट होउ शकते. प्रत्येक वर्षी पाण्याच्या नियोजनासाठी बैठक होते. मात्र कृती अंमलात येतंच नाही.त्यामुळेच सोलापूरकरांसमोर पाण्याचा प्रश्न दरवर्षी निर्माण होतो.

close