यूपीएच्या नेत्यांना सरकारी घरं खाली करण्याची नोटीस

July 30, 2014 9:01 PM1 commentViews: 2634

346kapil sibal_mulyam_5230 जुलै : सत्तेची दहा वर्ष उपभोगणार्‍या यूपीएच्या मंत्र्यांना आता परतीची वाट धरावी लागत आहे. यूपीएच्या काळातील 16 मंत्र्यांना सरकारी घरं सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. यात माजी मंत्री कपील सिब्बल, अजित सिंग आणि ए.के.अँटोनी यांचा समावेश आहे.

मोदी सरकार सत्तेवर येऊनही या मंत्र्यांनी सरकारने दिलेली घरं सोडलेली नाहीत. या घरांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी 21 लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

या माजी मंत्र्यांशिवाय इतरही 21 मंत्री सरकारी बंगल्यांमध्ये राहत आहेत. आता या मंत्र्यांना 15 दिवसांत ही घरं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आलेत. यामध्ये ए.के.अँटोनी, गुलाम नबी आझाद, वीरप्पा मोईली, शशी थरूर यांचा समावेश आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sudhir Mahale

    We should follow the process of Britain where they hand over key to their official residence before election

close