मुंबईत लोकल ट्रेन्स उशिराने

July 31, 2014 8:47 AM0 commentsViews: 5119

India Monsoon

31  जुलै :  मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे मुंबईकरांची ‘लाईफलाईन’ देखील रखडत सुरू आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवरील रेल्वे वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कामावर जाताना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

हार्बर मार्गावरील जीटीबी नगर आणि वडाळा स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकीची आणखी कोंडी झाली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close