नागपूरच्या विहिरी अटल्यानं शहरात पाण्याचा दुष्काळ

May 5, 2009 9:58 AM0 commentsViews: 2152

5 मे उन्हाच्या तडाख्यामुळे नागपूरच्या शहरी भागातल्या पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ जाणवत आहे. शहारातल्या विहिरी आटल्या आहेत. बोअरही कोरडे पडले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागत आहे. कित्येक उपनगरांमध्ये तर टँकर आला की पाण्यावरून वादावादीचेही प्रसंग घडत आहेत. गेल्यावर्षी नागपूरमध्ये पाऊस कमी पडला होता. कमी पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी कमी झाली होती. परिणामी पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे शहरात 175 टँकर्सनं पाणीपुरवठा केला जात आहे. एकीकडे 47 डीग्री तापमान आणि दुसरीकडे पाण्यासाठीची पायपीट या प्रकारानं नागपूरकर हैराण झाले आहेत.

close