मराठवाड्याच्या दुष्काळाचा फटका मोसंबीच्या बागांना

May 5, 2009 10:18 AM0 commentsViews: 2

5 मे मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीचा फटका तिथल्या मोसंबीच्या बागांना बसला आहे. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानं मोसंबीच्या बागा सुकल्यायत. नांदेडमध्येही मोसंबीच्या बागा सुकल्याने इतके दिवस मोठ्या निगराणीनं जपलेल्या बागा आता अक्षरशः तोडण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचं लाखो रुपयाचं नुकसानं झालं आहे. कित्येक शेतकर्‍यांनी कर्ज काढुना मोसंबीची लागवड केली होती . मात्र उत्पन्न काहीच झालं नसल्यानं शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात कमी प्रमाणात पाऊस होतं असल्यानं पाण्याची पातळी खालवत आहे. याचाही अतोनात त्रास शेतक-यांना होत आहे.

close