बराक ओबामांचं भारताच्या आऊटसोर्सिंगवर टीकास्त्र

May 5, 2009 10:27 AM0 commentsViews: 2

5 मे भारतातल्या आय.टी कंपन्यांना अमेरिकेत करसवलत हवी असेल तर कंपन्यांनी बंगळुरूमध्ये नोकर्‍या निर्माण करुन चालणार नाही, असा भारताला सज्जड दम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला आहे. ओबामांनी भारताच्या आऊटसोर्सिंगवर टीका करण्याची ही दुसरी वेळ आहे. ओबामांनी भारतीय आयटी इंडस्ट्रीतल्या कंपन्यांना लक्ष्य केलं आहे. भारतीय आयटी कंपन्यांनांना जर अमेरिकेतून करसवलत हवी असेल तर त्यांना अमेरिकेतच नोकर्‍या द्याव्या लागतील असा इशारा दिला आहे. तसंच कंपन्यांची कामं आऊटसोर्स करून अर्थव्यवस्था सुधारता येत नाही, असा टोलाही बराक ओबामांनी यावेळी लगावला.

close