काँग्रेसवर ‘पुस्तक बॉम्ब’, सरकारी फायलींना सोनियांची मंजुरी ?

July 31, 2014 4:35 PM1 commentViews: 1967

a01sonia_gandhi31 जुलै : काँग्रेस सरकारवर पुन्हा एकदा ‘पुस्तक बॉम्ब’ फुटला आहे. काँग्रेसचे माजी नेते नटवर सिंह यांनी केलेल्या एका दाव्यामुळे काँग्रेसला नामुष्की सहन करावी लागत आहे. या पुस्तकात सरकारच्या फायलींना सोनिया गांधी मंजुरी देत होत्या असा खळबळजनक दावा नटवर सिंह यांनी केलाय.

तसंच 2004 मध्ये यूपीएला बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकून पंतप्रधान होण्यास नकार दिला होता. प्रत्यक्षात राहुल गांधी यांनी त्यांना पंतप्रधान होण्यापासून अडवलं होतं, असा दावा नटवर सिंह यांनी आपल्या ‘वन लाईफ इज नॉट इनफ’या पुस्तकात केलाय.

आपले वडील राजीव गांधी यांच्याप्रमाणेच सोनिया गांधींचीही हत्या होईल अशी भीती राहुल यांना वाटत होती, असं नटवर सिंग यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.मात्र नटवर सिहांचा दावा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फेटाळला.10 जनपथला फाईल्स पाठवल्या जात नव्हत्या. या गोष्टींचं भांडवल करू नये अशी विनंतीही मनमोहन सिंग यांनी केली.

तर दुसरीकडे खुद्ध सोनिया गांधींनी नटवर सिंह यांचा दावा फेटाळून लावलाय. राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दहशत निर्माण झाली नव्हती असं त्यांनी सांगितलंय. तसंच मी स्वतःच पुस्तक लिहीन आणि त्यानंतर तुम्हाला सर्व काही माहित पडेल असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sham Dhumal

    पंतप्रधानांच्या (माजी) फायलींचे प्रकरण खरे असेल तर ते अतिशय गंभीर आहे. त्याची चौकशी होणे आवश्यक आहे.

close