कुर्ता ते ट्राऊजर…सबकुछ मोदी !

July 31, 2014 8:04 PM0 commentsViews: 2125

 31 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेहरावाची देशातच नाही तर परदेशातही चर्चा रंगलीय. नुकत्याच ब्रिक्स संमेलनाहून परतलेल्या मोदी यांच्या पेहरावाने परदेशातही छाप पाडलीय. तेव्हा पंतप्रधानांच्या या पेहरावावर हा एक स्पेशल रिपोर्ट..

‘फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन’, अशी इंग्रजीत म्हण आहे. ब्रिक्स परिषदेसाठी गेलेल्या पंतप्रधान मोदींकडे बघून या म्हणीची आठवण झाली. या संमेलनासाठी ते भारतातून निघाले तेव्हा त्यांनी घातला होता खास मोदी स्टाईल कुर्ता. पण, ब्राझिलमध्ये उतरताच त्यांचा लूक बदललेला होता. ट्राऊजर, शर्ट आणि स्कार्फ एकदम कॅज्युवल लूक..तेच ते संमेलनात पोचताच त्यांचा लुक एखाद्या सीईओसारखा होता. बंद गळ्याचा सूट आणि फॉर्मल शूज..

पंतप्रधान मोदींचा पुढचा दौरा आहे अमेरिकेचा. खास अमेरिका दौर्‍यासाठी त्यांनी नवा डिझायनर नेमलाय. ट्राय डिकॉस्टा याने बॉलिवूड खान्स ते मुकेश अंबांनींपर्यंतचे कपडे त्यानं डिझाईन केलेत. अमेरिकेचा मीडियाही मोदींना स्टाईल आयकॉन म्हणून बघतं.

न्यूयॉर्क टाईम्समध्ये लिहिलंय,
“मिशेल ओबामा यांच्या ड्रेसिंग सेंसवर लेख येतो. फ्रांसमधल्या निवडणुकीपूर्वी होलांद आणि रोजेफ यांच्या मेकओव्हरची चर्चा झाली. मंडेला यांच्या शर्टांवर टीका झाली. अशावेळी भारताचे नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पेहराव आणि त्याचा फॅशनवर पडणारा परिणाम एक केस स्टडीच आहे.”

तर वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहलंय,
“मिशेल ओबामा सोडा… जगाला आता एक नवा फॅशन आयकॉन मिळालाय आणि तो ब्लादिमीर पुतीन नाही तर पंतप्रधान मोदी आहेत.”

मोदींनी आपल्या खास शैलीनं जगाचं लक्ष आकर्षित केलंय. आता बघायचंय की, त्यांचं ड्रेस डिप्लोमसी जागतिक राजकारणावर काय प्रभाव पाडते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close