योगेश्वर दत्त आणि बबिता कुमारीने पटकावले सुवर्णपदक

July 31, 2014 11:37 PM0 commentsViews: 1005

babita_kumari

31 जुलै : ग्लासगोव्ह इथं सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरूच आहे. आजचा दिवस कुस्तीपटूंनी गाजवलाय. कुस्तीमध्ये योगेश्वर दत्तने 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. तर भारताच्या बबिता कुमारीने 55 किलो वजनी गटात फ्रिस्टाईल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलंय. कुस्तीमध्ये भारताने 5 सुवर्णपदक आणि 6 रौप्यपदक आणि 1 कास्यपदकासह 12 पदकं भारताच्या खात्यात जमा झाली आहे.

वेगवेगळ्या खेळात भारताला एकूण 46 पदकं मिळाली आहे. तर दुसरीकडे पुरुष गटात फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये 86 किलो वजनी गटात कुस्तीपटू पवन कुमारला मात्र पराभवाला सामोरं जावं लागलंय. तसंच कुस्तीमध्येच गितीका जाडने 63 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले आहे. तर दुसरीकडे दीपा कर्माकरने जिमनॅस्टीक्समध्ये कास्यपदक पटकावलंय. जिमनॅस्टीक्समध्ये पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरलीय. याअगोदर सुशील कुमार, अमित कुमार आणि विनेश यांनी सुवर्णपदकं भारताला मिळवून दिलीय.

भारताच्या खात्यात

सुवर्णपदक – 12
रौप्यपदक –  20
कास्यपदक – 14

एकूण 46
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close