माळीण दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 63 वर

August 1, 2014 1:01 PM0 commentsViews: 2714

IMG-20140730-WA0022
01 ऑगस्ट : आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावातल्या दुर्घटनेतल्या मृतांची आकडेवरीमध्ये वाढ होत मृतांची संख्या आता 63 वर गेली आहे. पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने NDRFच्या मदतकार्याला वेग आला आहे. या दुर्घटनेतून आतापर्यंत 10 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

आज मुख्य ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे पण माळीण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरल्याने NDRFच्या जवानांना मदतकार्यादरम्यान त्रास होत आहे. माळीण परिसरात बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे पण या गर्दीवर पोलिसांनी नियंत्रण ठेवलं आहे. या दुर्घटनेत अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 40 घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. अनेकांनी आपल्या जीवलगांना गमावलं असून त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. ढिगार्‍याखाली 100हून अधिकजण अजूनही अडकून पडल्याची भीती आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close