उत्तर-मध्य मुंबईत अवघं 34.35 टक्के मतदान

May 6, 2009 7:09 AM0 commentsViews: 5

6 मे, मुंबई उत्तर-मध्य मुंबई या मतदारसंघातल्या चार मतदान केंद्रांवर 34.35 टक्के इतकं फेर मतदान झालं. हे फेरमतदान कुर्ला आणि कलिना इथल्या प्रत्येकी दोन- दोन मतदान केंद्रांत झालं. या फेरमतदानाला तिथल्या स्थानिक नागरिकांनी अत्यंत कमी प्रतिसाद दिला. कुर्ला वॉर्ड क्रमांक 229 मध्ये 30 टक्के, कुर्ला वॉर्ड क्रमांक 232 मध्ये 28 टक्के, कलिना वॉर्ड क्रमांक 183 मध्ये 29 टक्के आणि कलिला वॉर्ड क्रमांक 185 मध्ये 20 टक्के इतकं मतदान झालं. या कमी फेर मतदानाचा फटका काँग्रेसच्या प्रिया दत्त, मनसेच्या शिल्पा सरपोतदार, सेना-भाजप युतीचे महेश जेठमलानी यांना बसणार आहे. मतदानयंत्र बिघडल्यानं उत्तर-मध्य मुंबईत फेरमतदान घेण्यात आलं. मूळात हा मध्यमवर्गीय भाग असल्यामुळे इथे सर्वात जास्त मतदान होतं. 30 एप्रिलच्या मतदानानंतर बहुतेक मतदार गावी गेल्यानं मतदान कमी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदांचं फेरमतदान काही टक्क्यांपर्यंतच मर्यादीत राहिलं आहे.

close