आता सकळांचा झालाय विठुराया !

August 1, 2014 8:51 PM0 commentsViews: 1139

01 ऑगस्ट : आज खर्‍या अर्थानं विठुराया सकळांचा देव झाला. मंदिराच्या 900 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बहुजन समाज आणि महिलांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची पूजा झाली. सुप्रीम कोर्टाने दिलेला ऐतिहासिक निर्णय आणि मंदिर समितीने केलेल्या अंमलबजावणीमुळे विठ्ठलपूजेवरील बडव्यांची मक्तेदारी आज संपुष्टात आली. आज पहाटेच्या काकडआरतीपासून मुलाखतीद्वारे नियुक्त झालेल्या पुजार्‍यांनी विठुरायाची षोडशोपचारे पूजा केली. या पुजार्‍यांमध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचे 17 वे वंशज केदार नामदास होते तसंच कर्नाटकातून आलेले राचेय्या हिरेमठ हेही विठ्ठलाच्या सेवेसाठी उत्सुक होते. दुसरीकडे रुक्मिणीमातेची पूजा उर्मिला भाटे या महिलेनं केली.पुजार्‍यांमध्ये ब्राह्मण, गुरव, शिंपी, कासार आणि जंगम जातीच्या पुजार्‍यांचा समावेश आहे. संत ज्ञानेश्वरांपासून संत चोखामेळा यांना अभिप्रेत असलेल्ही समतेची दिंडी विठ्ठल मंदिरातून सुरू होऊन आता भारतातील प्रत्येक मंदिरात पोहोचावी हीच अपेक्षा..

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close