डाव्यांना बरोबर घेतल्यास युपीएमधून बाहेर पडू : ममता बॅनर्जी यांचा इशारा

May 6, 2009 8:57 AM0 commentsViews: 1

6 मे डाव्यांना बरोबर घेतलं तर युपीएमधून बाहेर पडू असा इशारा ममता बॅनर्जी यांनीकाँग्रेसला दिला. काल चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकीचा प्रचार संपला. त्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषदत घेतली होती. या पत्रकार परिषेद राहुल गांधी यांनी सत्ता स्थापनेकरता डाव्यांची मदत घेऊ असं विधान केलं होतं. राहुल गांधी यांनी वर्तवलेल्या शक्येतला तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध केला आहे. तसंच केंद्रात सरकार स्थापनेसाठी, काँग्रेसनं डाव्या पक्षांचा पाठिंबा घेतला, तर युपीएमधून बाहेर पडू असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी सावध पवित्रा घेतला आहे.

close