नागपूरमध्ये शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आरती बोरकरांची हत्या

August 2, 2014 12:04 PM0 commentsViews: 4016

nagpur_aarti_boarkar02 ऑगस्ट : नागपूरमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या घटनांनी डोकंवर काढलंय. नागपूरच्या इतवारीतील लालगंज परिसरात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आरती बोरकर यांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

आरती बोरकर यांचे पती अनिल बोरकर हे या हल्ल्यातून बचावले आहे. स्थानिक लोकांनी एका हल्लेखोराला जागीच पकडले आहे. रेशन माफियांच्या विरोधात आरती बोरकर यांनी आवाज उठवला होता.

त्यामुळे अशाच माफियांनी सुपारी देवून ही हत्या केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. पाचपावली पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close