कुस्तीपटूंचं जंगी स्वागत

August 2, 2014 5:05 PM0 commentsViews: 218

02 ऑगस्ट : ग्लासगोव्हमधल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय मल्लांनी चमकदार कामगिरी केली. या कामगिरीनंतर भारतात परतलेल्या खेळाडूंचं दिल्लीच्या इंदिरा गांधी एअरपोर्टवर जंगी स्वागत करण्यात आलं. भारतीय मल्लांनी आतापर्यंत 13 मेडल्स पटकावली आहेत. यामध्ये 5 सुवर्णपदक, 6 रौप्यपदक, आणि 2 कास्यपदकांचा समावेश आहे. पुरूषांच्या फ्रीस्टाईल गटामध्ये सुशीलकुमार, योगेश्वर दत्त आणि अमित कुमार यांनी सुवर्णपदकं पटकावली आहे. तर महिलांमध्ये 19 वर्षाच्या विनेश फोगट आणि बबिता कुमारी यांनी सुवर्णपदकं पटकावलीत..
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close