मुंबई इंडियन्सचा मुकाबला डेक्कन चार्जर्सशी

May 6, 2009 11:40 AM0 commentsViews: 2

6 मे आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्सचा मुकाबला डेक्कन चार्जर्सशी आहे. पण या मॅचअगोदरंच मुंबईची टीम बॅकफूटवर गेली आहे. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा भरवशाचा फास्ट बॉलर झहीर खान खेळू शकणार नाही. दुखापतीमुळे झहीर या मॅचला मुकणार आहे. झहीर खान आत्तापर्यंत मुंबईचा हुकमी एक्का ठरलाय. झहीरने 23.66 च्या ऍव्हरेजने 6 मॅचमध्ये 6 विकेट घेतल्या आहेत. आतापर्यंत 31 रन्सवर 3 विकेट ही त्याची बेस्ट बॉलिंग ठरली आहे. त्यामुळे झहीरची कमतरता मुंबई इंडियन्सला नक्कीच भासणार आहे यात शंका नाही. यापूर्वी एकदा पराभव पत्करावा लागलेल्या हैदराबादला पुन्हा एकदा शरणागती पत्करावी लागण्याची संधी मुंबई इंडियन्स शोधताहेत. यामुळे मॅचची रंगत वाढणार आहे . आयपीएलमध्ये दुसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली असली तरी कोणत्या टीम सेमी फायनलमध्ये पोहचणार याचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. प्रत्येक मॅचनंतर पॉईंटटेबलचं चित्र बदलतंय. महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई सुपर किंग्जनं आठ मॅचमध्ये चार विजय मिळवत नेट पॉईंटटेबलमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. तर किंग्ज इलेव्हनचा दणदणीत पराभव करत सरस रनरेटच्या आधारावर राजस्थान रॉयलनं सातव्या क्रमांकावरुन थेट दुसर्‍या क्रमांकावर उडी मारलीय. दिल्ली डेअरडेव्हिल्स या यादीत तिसर्‍या तर डेक्कन चार्जर्स चौथ्या क्रमांकावर आहे. स्पर्धेत कमबॅक केलेल्या बंगलोर रॉयल चॅलेंजर्सनं सलग चार मॅच जिंकत पाचवा क्रमांक पटकावलाय. तर किंग्ज इलेव्हनची पुन्हा एकदा सहाव्या स्थानावर घसरण झालीय. सचिन तेंडुलकरच्या मुंबई इंडियन्ससमोरची आव्हानही वाढली आहेत. या टीमची सध्या सातव्या क्रमांकावर उतरण झाली आहे तर नाईट रायडर्स आठव्या क्रमांकावर कायम आहे.

close